धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव पोलीस दलातील अधिकारी व कर्मचा-यांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेला ८९१.११९ किलो ग्रॅम गांजा १६ डिसेंबर रोजी नष्ट केला. धाराशिव शहरातील पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर आग लावून गांजा नष्ट करण्यात आला.
धाराशिव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील जप्त गांजा न्यायालयाने नाश करण्याची परवानगी दिली होती. तुळजापूर पोलीस ठाणे, बेंबळी पोलीस ठाणे, नळदुर्ग पोलीस ठाणे, भूम पोलीस ठाणे, येरमाळा पोलीस ठाणे, मुरुम पोलीस ठाणे, धाराशिव शहर पोलीस ठाणे आदी ७ पोलीस ठाण्यात दाखल १५ गुन्ह्यातील एकूण ८९१.११९ किलो ग्रॅम गांजा जप्त केलेला होता.
दि. १६ डिसेंबर रोजी सायंकाळी पोलीस मुख्यालय धाराशिव येथील कवायत मैदान येथे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्र्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, पोलीस उपअधीक्षक (गृह) सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ कार्या्रलयाचे संतोषकुमार चव्हाण, नायब तहसिलदार घृष्णेश्वर स्वामी, निरीक्षक वैद्यमापन शास्त्र अशोक पवार, त्यांचे सहकारी सय्यद अशपाक,अग्नीशामक दल येथील संभाजी साळुंके, भारत म्हस्के (मंडळ अधिकारी) सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश पवार, सपोफौ काझी, पोलीस हावलदार औताडे, जावेद काझी, विनोद जानराव, पोलीस नाईक बबन जाधवर, पोलीस अंमलदार योगेश कोळी, फोटोग्राफर श्री. शेख, व्हिडीओग्राफर पोलीस अमंलदार विठ्ठल गरड यांच्या उपस्थितीत सर्व कायदेशीर बाबीची पुर्तता करुन योग्यरित्या जाळून गांजा नष्ट करण्यात आला.