22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीचे ९ उमेदवार जिंकले

महायुतीचे ९ उमेदवार जिंकले

मुंबई : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले असून अकराव्या जागेसाठी मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या एकमेव उमेदवार प्रज्ञा सातव यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या आघाडीवर होत्या. मात्र, नंतर अचानक भाजप उमेदवार आघाडीवर आले. यानंतर अखेर प्रज्ञा सातव यांनी २३ मतांचा कोटा पूर्ण केला आणि विजय मिळवला.

अजितदादा गटाचे राजेश विटेकर हे २३ मतांनी आणि शिवाजीराव गर्जे हे २४ मतांनी विजयी झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे सदाभाऊ खोत यांनी दुसऱ्या पसंतीची अधिक मतं घेऊन विजय मिळवला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भावना गवळी यांना २४ मतं मिळाली असून त्या विजयी झाल्या आहेत. विधान परिषद निवडणुकीमध्ये योगश टिळेकर, पकंजा मुंडे आणि परिणय फुके विजयी झाले आहेत. मात्र अधिकृत घोषित करण्यात आले नाही.भाजपच्या पंकजा मुंडे पहिल्या पसंतीत विजयी झाल्या आहेत. पंकजा मुंडे यांना २६ मतं मिळाली आहेत.

आतापर्यंत उमेदवारांना मिळालेली मतं खालील प्रमाणे….
योगेश टिळेकर : २३
परिणय फुके : २०
राजेश विटेकर : २१
अमित गोरखे : २२
शिवाजीराव गर्जे : २०
पंकजा मुंडे : १८
मिलिंद नार्वेकर : १७
प्रज्ञा सातव : १९
सदाभाऊ खोत : १०
कृपाल तुमाने : १६
भावना गवळी : १०
जयंत पाटील : ०६

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR