23.5 C
Latur
Sunday, October 13, 2024
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशातील मैहरमध्ये बस-ट्रकच्या धडकेत ९ ठार, २४ जखमी

मध्य प्रदेशातील मैहरमध्ये बस-ट्रकच्या धडकेत ९ ठार, २४ जखमी

मैहर : प्रयागराजहून नागपूरला जाणा-या प्रवासी बसने शनिवारी रात्री मध्य प्रदेशातील मैहर जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हायवा ट्रकला धडक दिल्याने नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २४ जण जखमी झाले आहेत. जखमींना सतना, आम्रपाटन आणि मैहर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये ४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आभा ट्रॅव्हल्सची स्लीपर कोच बस (यूपी ७२ एटी ४९५२) यूपीच्या प्रयागराजहून नागपूरला जात होती. नाडन देहात पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग-३० वर रीवा-जबलपूर चार मार्गावरील चौरसिया ढाब्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या हायवा ट्रक (सीजी ०४ एनबी ६७८६) ला धडकली.

अपघाताच्या वेळी बसमध्ये ४५ प्रवासी होते. ही धडक इतकी भीषण होती की गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. यानंतर बचत पथकांनी गॅस कटर आणि जेसीबी मशिनच्या सहाय्याने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक दिनेश कुमार, सीओ अरुण कुमार, तहसीलदार राधेश्याम शर्मा आणि पोलिस निरीक्षक सत्येंद्र कुमार हे घटनास्थळी पोहोचले.

या भीषण अपघातात राम अवतार लल्लू यादव (६०), जितेंद्र राजू प्रांजल (१८), मोतीलाल अंबिका प्रसाद (५५) आणि अजय कुमार गणेश साहू (२) अशी मृतांची नावे आहेत. २३ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य तिघांचा रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR