17.2 C
Latur
Sunday, January 11, 2026
Homeपरभणीपिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ९ महिन्यांच्या बालिकेचा अखेर मृत्यू

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ९ महिन्यांच्या बालिकेचा अखेर मृत्यू

परभणीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

जिंतूर : शहरातील साबळे गल्ली परिसरात पिसाळलेल्या कुर्त्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जुनेशा तौफिक कुरेशी (९ महिने) या चिमुकलीचा उपचारादरम्यान रविवार दि. ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास परभणी येथील एका खासगी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास साबळे गल्ली येथील आपल्या राहत्या घराच्या दारात जुनेशा ही बहिणीच्या कडेवर असताना परिसरात फिरत असलेल्या पिसाळलेल्या कुर्त्याने अचानक तिच्यावर हल्ला चढवला. यावेळी मोठ्या बहिणीने तिला खाली सोडल्यामुळे कुत्र्याच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली होती. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून परभणीच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिका-यांनी बालिकेला रेबीज झाल्याचे निदर्शनास आणून दिले.

तिची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत असल्याने नातेवाईकांनी पुढील उपचारांसाठी तिला परभणी येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, सर्वतोपरी उपचार करूनही रविवारी दुपारी उपचारादरम्यान तिचा दुदैर्वी मृत्यू झाला.

या घटनेमुळे साबळे गल्ली परिसरासह संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे. अवघ्या ९ महिन्यांच्या निष्पाप बालिकेच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुर्त्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नगरपरिषद व प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR