17.5 C
Latur
Sunday, January 19, 2025
HomeFeaturedबसमधील पंजाबच्या ९ प्रवाशांचे ओळखपत्र पाहून केली हत्या

बसमधील पंजाबच्या ९ प्रवाशांचे ओळखपत्र पाहून केली हत्या

नोश्की : शनिवारी पहाटे बलुचिस्तानच्या नोश्कीजवळ बंदूकधा-यांनी नऊ जणांची हत्या केली. प्रवाशांना बसमधून उतरवून त्यांचे ओळखपत्र पाहून त्यांची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आणखी एका वाहनावरही हल्ला करण्यात आला, त्यात एक जण ठार झाला आणि चार जण जखमी झाले.

या प्रकरणी डॉन डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात नमूद केले आहे की, उपायुक्त हबीबुल्ला मुसाखेल यांनी सांगितले की, नोश्कीजवळील सुलतान चरहाईच्या आसपास सुमारे १०-१२ बंदूकधा-यांनी क्वेटा-तफ्तान महामार्ग एन-४० ब्लॉक केला. यानंतर बसमधून नऊ प्रवाशांचे अपहरण करण्यात आले. ते म्हणाले की, बंदूकधा-यांंनी तफ्तानला जाणा-या बसमधील प्रवाशांची ओळखपत्रे तपासली. यानंतर त्याचे अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली.

डॉन न्यूज टीव्हीने सांगितले की, अपहरण केलेल्या प्रवाशांचे मृतदेह जवळच्या पुलाखाली सापडले आहेत. त्यांची लूट झाली की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नोश्की स्टेशन हाऊस ऑफिसर असद मेंगल यांनी सांगितले की, ज्या नऊ जणांची हत्या करण्यात आली ते पंजाबचे होते.

बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती म्हणाले की, नोश्की हायवेवर ११ लोकांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना माफ केले जाणार नाही आणि त्यांना लवकरच पकडले जाईल.

या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग केला जाईल, बलुचिस्तानची शांतता बिघडवणे हा त्यांचा उद्देश असल्याचे बुगती यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR