21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeपरभणीराज्यस्तरीय शालेय स्केटींग स्पर्धेसाठी ९ खेळाडूंची निवड

राज्यस्तरीय शालेय स्केटींग स्पर्धेसाठी ९ खेळाडूंची निवड

परभणी : जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय विभागीय शालेय रोलर स्केटींग स्पर्धा दि.१६ रोजी विभागीय क्रीडा संकुल स्केटिंग ट्रॅक छ. संभाजीनगर येथे पार पडल्या. या स्पर्धत रिंग रेसर ५००, ४०० मीटर व रोड रेस ४०० मीटर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत स्केटींग संघटनेचे ९ खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

या विजयी खेळाडूत ११ वर्ष आतील मुली सादिया सुलताना, शेजल भराडे, १४ वर्ष आतील मुले मुली रघविर देशमुख, साई साठे, हाजरा फातेमा, सारा सुलताना, १७ वर्ष आतील मुले, मुली प्रतिक पांचाळ, हषिता गिराम, श्र्वेता देवडे यांचा समावेश आहे.

राज्यस्तरीय स्पर्धा मुंबई येथे होणार आहेत. या स्पर्धकांना मुख्य प्रशिक्षक सुर्यकांत डहाळे, आतीती डहाळे यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा क्रिडाधिकारी कविता नावंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष डॉ. गणेश देशमुख, रमाकांत जोशी, मनपाचे क्रिडाधिकारी राजकुमार जाधव, ज्ञानेश्वर घुले, आयोध्या बिललाडे, दिनेश साले, रविकांत घन आदिंनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR