31.2 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeलातूरलातूर विभागात १२ वीचे ९५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

लातूर विभागात १२ वीचे ९५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

बारावीची परीक्षा २४९ केंद्रांवर

लातूर : प्रतिनिधी
लातूर, नांदेड व धाराशिव या तीन जिल्ह्यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागाच्या वतीने दहावी, बारावी परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. विभागातील तीन्ही जिल्ह्यांतून एकुण ९५ हजार ६९७ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत.

यंदा विद्यार्थी संख्येचा विचार करुन परीक्षा केंद्रात वाढ करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा २४९ केंद्रांवर होणार आहे. बारावीच्या परीक्षेस ९५ हजार ६७९ विद्यार्थी बसणार असून हे विद्यार्थी नांदेडमधील ३४६, लातूरमधील ३७२ तर धाराशिवमधील १८१ अशा एकुण ८९९ महाविद्यालयातील आहेत असे लातूर विभागीय मंडळातर्फे सांगण्यात आले.

इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक (तोंडी) परीक्षा दि. २४ जानेवारीपासून सूरु झाली. ती १० फेबु्रवारीपर्यंत चालणार आहे. लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान होणार आहेत. शिक्षण मंडळाकडून परीक्षेचे नियोजन पुर्ण झाले असून परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी पावले उचलली जात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR