बोरी : येथील ज्ञानोपासक विद्यालयातील इयत्ता २०००-२००१ दहावी बॅचचे विद्यार्थी आणि शिक्षकवृंदांचा स्नेह मेळावा दि.२३ मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. २४ वर्षानंतर भेटल्यामुळे काहींच्या चेह-यावर हास्य तर काहींचे डोळे पाणावले होते.
या स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष ज्ञानोपासक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक लक्ष्मण मातने होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक वृंद सुरेशराव सोळंके, लिंबाजीराव आहेर, नंदकुमार खोडके, धनंजयराव देशमुख, रमाकांत गायकवाड, अशोकराव भोसले, दत्तात्रय जाधव, प्रशांत भरणे, मनोहर सोनवणे, लक्ष्मणराव शिंदे, शिवाजी खोकले, प्रेमलता सावरगावकर उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करून शिक्षकवृंद यांचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ व शेला देऊन यथोचित सत्कार केला. शिक्षकवृंदांनी आपल्या पुढच्या पिढीला संस्काराची शिदोरी देण्याचे आव्हान केले. सर्व माजी विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांची काळजी घ्यावी व त्यांना आपल्यापासून दूर करू नये अशी एक आशा व्यक्त केली. विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक जुन्या आठवणी ऐकून मनसोक्त हसले, अविस्मरणीय आठवणी घेऊन ते परतले.
दुपारच्या सुरुची भोजनानंतर परभणी येथील व्यापारी विजय डागा व शिक्षक लक्ष्मण शिंदे यांनी संगीत सादर करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रास्ताविक स्वदेश कदम यांनी तर आभार प्रदर्शन आसाराम दुधाटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रविण लाखकर यांनी केले. यशस्वीतेसाठी प्रविण लाखकर, भानुदास काठोळे, रमेश अंभुरे, विनायक लोखंडे, प्रकाश अभिजीत चौधरी विठ्ठल कंठाळे, कैलास नवाळ, महेश देशमुख, विष्णू डोंबे यांनी आयोजक म्हणून परिश्रम घेतले.