24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeउद्योगअन्नधान्य महागाईत दोन आर्थिक वर्षांत ९७ टक्क्यांनी वाढ

अन्नधान्य महागाईत दोन आर्थिक वर्षांत ९७ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : आर्थिक सर्वेक्षण २०२४ मध्ये महागाईबाबतचिंता व्यक्त करण्यात आली. टोमॅटो, कांद्याचे भाव तसेच डाळींच्या वाढत्या महागाईबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. याचे मुख्य कारण आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे, आर्थिक सर्वेक्षण २०२४ जाहीर झाले आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.५ ते ७ टक्क्यांदरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्ती करण्यात आला. महागाईबाबत आर्थिक सर्वेक्षणात चिंता व्यक्त करण्यात आली.

अन्नधान्याची चलनवाढ कायम असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. टोमॅटो आणि कांद्याचे भाव वाढत आहेत. तर डाळींचे दरही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. हवामान बदलामुळे या सगळ्या गोष्टी होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एकीकडे उष्णतेमुळे पिकांचे नुकसान होतंय तर दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पीक आणि पुरवठा साखळी प्रभावित होत असल्याचे त्यात म्हटले आहे.

अन्नधान्य महागले
आर्थिक सर्वेक्षणानुसार महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे अन्नधान्याच्या किमतीत झालेली वाढ आहे. सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ग्राहक अन्न किंमत निर्देशांकवर सर्वोत्तम अन्न महागाई ३.८ टक्के दिसली. जे आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ६.६ टक्क्यांवर आले. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये अन्नधान्य महागाई ७.५ टक्क्यांवर दिसली आहे. अर्थ अन्नधान्याच्या महागाईत गेल्या दोन आर्थिक वर्षांत ९७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जून महिन्यात अन्नधान्य महागाई दर ९.५५ टक्के होता, तर मे २०२४ मध्ये हा आकडा ८.६९ टक्के होता.

महागाई वाढण्याचे कारण काय?
आर्थिक सर्वेक्षणात महागाईला हवामान बदल जबाबदार असल्याचे म्हटले गेले आहे. देशाच्या विविध भागात वाढती उष्णता, जास्त पाऊस, अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळ यामुळे अन्नधान्याच्या किमती वाढल्याचे आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. अतिउष्मा आणि अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी होत असल्याने भाजीपाल्याचे दर वाढल्याचे सर्वेक्षणात म्हटलंय. कांदा आणि टोमॅटोच्या दरात झालेली मोठी वाढ देखाल यासाठी जबाबदार आहे. डाळींचे गेल्या दोन वर्षांत उत्पादन कमी झाले आहे आणि दरात वाढ झाली आहे.

जून महिन्यातील महागाईची आकडेवारी जुलैमध्ये समोर आली आहे. जूनमध्ये किरकोळ महागाईचा दर पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, भारतातील किरकोळ महागाई दर ५.०८ टक्के होता. तर मे महिन्यात किरकोळ महागाई दर ४.७५ टक्के होता. जे सुमारे वर्षभरातील नीचांकी पातळीवर होते. मे महिन्यात महागाईचा दर ४.८३ टक्के होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR