32.2 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रसप्तशृंगी गडावर पिकअप उलटून २६ भाविक जखमी

सप्तशृंगी गडावर पिकअप उलटून २६ भाविक जखमी

वणी : वणी येथे सप्तशृंगी गडावर नवसपूर्तीसाठी पिकअपमधून जात असताना दरेगाव भागातील मोहनदरी येथील वळणाचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटलेल्या पिकअप वाहनाचा अपघात होउन २६ भाविक जखमी झाले.

याबाबत माहिती अशी की, एम. १५ जीव्ही १५३८ क्रमांकाच्या पिकअप वाहनामधून मंगळवारी सकाळच्या सुमारास सुमारे २६ भाविक नाशिक येथून सप्तशृंगी गडाकडे नवसपूर्तीसाठी निघाले. नाशिक-कळवण या रस्त्यावरून मार्गक्रमण करत असताना दरेगाव भागातील मोहनदरी फाट्याजवळ पिकअप चालकाचे नियंत्रण सुटले व सदर पिकअप पलटी झाली.

अपघातानंतर आवाज झाल्याने रस्त्यावरील वाहनचालक व परिसरातील नागरिक तसेच नांदुरी टॅक्सी चालक-मालक संघटना पदाधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व रुग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR