32.2 C
Latur
Tuesday, April 29, 2025
Homeमहाराष्ट्रसर्व धरणांवर फ्लोटिंग सोलर बसवले जाणार

सर्व धरणांवर फ्लोटिंग सोलर बसवले जाणार

राज्य सरकारचा निर्णय; शेतक-यांना होणार फायदा

मुंबई : प्रतिनिधी
पाण्याचे बाष्पीभवन रोखण्याच्या संदर्भात लवकरच राज्य सरकार मोठा निर्णय घेणार आहे. यासाठी राज्यात फ्लोटिंग सोलर योजना राबवली जाणार आहे. सर्व धरणांवर फ्लोटिंग सोलर बसवले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, फ्लोटिंग सोलरमधून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती देखील होणार आहे. याबाबत लवकरच निविदा जाहीर होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील प्रमुख धरणांवर फ्लोटिंग सोलरच्या माध्यमातून वीजनिर्मिती केल्यामुळे याचा मोठा फायदा शेतक-यांना होणार आहे.

त्यामुळे शेतक-यांना एक प्रकारचा या निर्णयातून दिलासा मिळणार आहे. या माध्यमातून स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देण्यास मदत मिळणार आहे. दरम्यान, शेतक-यांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कमी दरात वीज उपलब्ध झाल्यास शेतक-यांना शेतीत मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या ८ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप मांडला होता. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, वाटचाल, ध्येयधोरणे आणि भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत अग्रस्थानी नेण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचा वाटा अशा विविध अंगांवर भाष्य केले होते. थोरीयमवर न्यूक्लिअर एनर्जी असावी यासाठी प्रयत्न करतोय, हे नवीन तंत्रज्ञान आहे. जायकवाडीवर १२०० मेगावॅटचा फ्लोटिंग प्लांट आम्ही करत असल्याची माहिती परदेशी यांनी दिली होती.

नवीन तंत्रज्ञान अवगत करणे आणि फायदा घेणे हा एक उद्देश. लाँगटर्म अर्थात दीर्घ मुदतीचे कर्ज घेण्याचे आपले प्रयत्न आहेत. कर्ज छोटे घेतले तर प्रकल्प पूर्ण होण्याआधीच आपल्याला कर्ज फेडावे लागतात आणि अनेकदा डेब्ट निर्माण होते. या बँकांचे व्याजदर खूप कमी असतात. सोबतच पैसे नॉन कॅपिटलवर वळते करता येत नाहीत, असे परदेशी म्हणाले होते.

विकासासाठी अतिरिक्त पैसा उभा करण्याचा प्रयत्न आम्ही करू. शासनात दररोजचे प्रश्न सोडवायला लागतात, अशात पुढील १० वर्षांत नेमके काय होणार यासाठी विचार करायला वेळ नसतो. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या आधारे विकास व्हावा आणि पुढील विचार करावा हे प्रयत्न आमचे असतील, असे प्रवीण परदेशी यांनी सांगितले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR