33.9 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात बसचे ब्रेक फेल; अनेक गाड्यांना चिरडले

पुण्यात बसचे ब्रेक फेल; अनेक गाड्यांना चिरडले

पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. मुंबईतील कुर्ला अपघातासारखीच ही घटना आहे. दुचाकी आणि अन्य वाहनांना धडक दिल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, पुण्यातील पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला. चांदणी चौकातून पुणे शहराच्या दिशेने येत असताना पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे मोठा अपघात घडला. या बसने ५ ते ६ दुचाकी, एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईतील कुर्ला अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे म्हटले जात आहे.

मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एस. जी. बर्वे मार्गावर सोमवारी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बेस्ट बसने अनेक गाड्यांना धडक दिली होती. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यानंतर आता पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले. या बसने ५ ते ६ दुचाकी, एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ ते ५ जण जखमी झाले. पुण्यातील एका दुकानाच्या बाहेरील सीसीटीव्हीत ही सर्व घटना कैद झाली आहे. या व्हीडीओत चांदणी चौक परिसर पाहायला मिळत आहे. त्यात एक निळ्या रंगाची पीएमपीएमएल बस आली. त्या बसने सुरुवातीला एका दुचाकीला धडक दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR