32 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeमहाराष्ट्रभाजपचे माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांचे निधन

भाजपचे माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांचे निधन

नागपूर :
भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते, माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांचे आज वयाच्या ६५ व्या वर्षी (बुधवार) चेन्नई येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. उद्या त्यांच्या पार्थिवावर अन्त्यसंस्कार केले जातील.
पक्षसंघटना, कार्यकर्ता, माणूस व विचारासाठी झटणारा, पूर्ण आयुष्य वेचणारे उत्तम कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले रामदास आंबटकर गेले काही दिवस किडनी विकाराने महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थकेअर सेंटर चेन्नई येथे उपचारासाठी दाखल होते. त्यांच्या मागे पत्नी गीता, भगिनी, मुलगा अजिंक्य आणि परिवार आहे.

माजी आमदार डॉ. रामदास आंबटकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. विदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी कायम आवाज उठवला. कुशल संघटक आणि विचारधारेप्रती कायम समर्पित असलेल्या रामदास आंबटकर यांच्या निधनाने विदर्भातील सामाजिक-राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली असे गडकरी यांनी म्हटले आहे.

डॉ. रामदास भगवानजी आंबटकर यांचा जन्म १ जुलै १९६० रोजी वर्धा जिल्ह्यातील वडनेर या छोट्याशा गावात झाला. त्यांच्या वडिलांनी सलग तीन वेळा भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आणि आयुष्यभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार आणि शिकवण खोलवर रुजवली. त्यांच्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन डॉ. रामदास यांनीही राष्ट्र उभारणीसाठी आणि लोकांची सेवा करण्यासाठी संघाच्या माध्यमातून स्वत:ला समर्पित करण्याचा निर्णय घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR