38.2 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeलातूर‘नीट’ परीक्षार्थींच्या सोयीसाठी शहर वाहतूक बस सेवा

‘नीट’ परीक्षार्थींच्या सोयीसाठी शहर वाहतूक बस सेवा

लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट-२०२५ ही परीक्षा आज दि. ४ मे रोजी दुपारी २ ते ५ लातूर जिल्ह्यातील विविध ५१ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. लातूर शहरातील परीक्षार्थींच्या सोयीसाठी लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शहर वाहतूक बसची सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
नीट परीक्षेसाठी लातूर शहरांत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून विद्या­र्थी येत असून त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता नीट परीक्षेच्या दृष्टीने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बैठकीमध्ये निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने आयुक्त देविदास जाधव व उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे यांनी शहरातील जास्­तीत जास्­त बससेवा परिक्षा केंद्राच्­या मार्गावर सोडण्­याचा निर्णय घेतला असुन त्­या दृष्­टीने नियोजन करण्­यात आलेले आहे. तरी खालील प्रमाणे सकाळी ९.०० ते सायं. ६.०० या वेळेमध्­ये जास्­तीत जास्­त सिटी बसेस विद्या­थ्र्­यांसाठी मार्गावर उपलब्­ध असुन याचे नियोजन खालील प्रमाणे आहे.
गंजगोलाई ते कोळपा (नांदेड नाका)- २ बसेस, गंजगोलाई ते छत्रपती चौक (वाडा हॉटेल जवळ) ते पीव्हीआर चौक-२ बसेस, गंजगोलाई ते हरंगुळ १२ नं. पाटी-२ बसेस, गंजगोलाई ते एमआयटी कॉलेज-२ बसेस, जुना रेणापूर नाका ते हरंगुळ १२ नं. पाटी-२ बसेस, जुना रेणापूर नाका ते पीव्हीआर चौक ते छत्रपती चौक (वाडा हॉटेल जवळ)-२ बसेस, जुना रेणापूर नाका ते गंज गोलाई-२ बसेस. तरी सर्व विद्यार्थी व त्­यांच्­या पालकांना मनपा मार्फत आवाहन करण्­यात येते की, लातूर मनपाने नियोजन केलेल्­या सिटी बस सेवेचा जास्­तीत जास्­त लाभ घ्­यावा व वाहतुक कोंडी टाळावी.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR