30.2 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार, नराधम बाप जेरबंद

अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार, नराधम बाप जेरबंद

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करून फरार झालेल्या नराधम पित्याला पैठण पोलिसांनी सव्वादोन महिन्यांनंतर जेरबंद केले. २२ फेब्रुवारी रोजी याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती. याप्रकरणी पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी आंतोन श्यामसुंदर गायकवाड याच्यावर ‘पोक्सो’सह बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, आरोपी आंतोन श्यामसुंदर गायकवाडला पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातून तडीपार केलेले आहे. तो पीडित मुलीच्या आईसोबत नाथमंदिर परिसरात राहात होता. त्याने १४ वर्षीय सावत्र मुलीवर सलग ६ महिने अत्याचार केले. अत्याचार करू न दिल्यास तुझ्या आईसह तुझीही कोयत्याने खांडोळी करून टाकीन! अशी धमकी देत या नराधमाने हा घृणास्पद प्रकार चालवला होता. पीडितेच्या आईने तक्रार दिल्यावर ही कारवाई करण्यात आली.

पीडितेची ३५ वर्षीय आई ही अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. गावातीलच अंतोन श्यामसुंदर गायकवाड याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहते. दरम्यान पीडितेची आई अधूनमधून तिच्या पहिल्या नव-याच्या मुलीला भेटायला अहिल्यानगर जिल्ह्यातील गावी जात असे. तिच्या अनुपस्थितीत आरोपी अंतोन गायकवाड याने अल्पवयीन सावत्र मुलीवर अत्याचार केले.

पीडित मुलीने हिंमत करून सर्व माहिती आईला कथन केली. पीडित मुलीच्या आईने तत्काळ पैठण पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांनी विविध कलमांद्वारे नराधम सावत्र पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून नराधम पिता आंतोन श्यामसुंदर गायकवाड हा पोलिसांना हुलकावणी देत होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR