27.8 C
Latur
Sunday, May 4, 2025
Homeलातूरआकनगिरे, उरगुंडे यांना 'मराठवाडा आयकॉन' पुरस्कार

आकनगिरे, उरगुंडे यांना ‘मराठवाडा आयकॉन’ पुरस्कार

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर सारख्या ग्रामीण भागात राहून श्रीकृष्णा एंटरप्रायजेसच्या माध्यमातून गेल्या २४ वर्षापासून महाराष्ट्रभर सोलार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या अमर अकनगिरे आणि राहूल उरगुंडे यांना एका वृत्त समूहाकडून दिला जाणारा मानाचा २०२५ चा ‘मराठवाडा आयकॉन ‘ पुरस्कार सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, मागासवर्गीय बहुजन विकासमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शनिवार (दि.३ ) रोजी छत्रपती संभाजीनगर येथे प्रदान करण्यात आला.

विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणा-या मराठवाड्यातील कर्तृत्वान व्यक्तींची वृत्तपत्र समूहाच्या वतीने रेणापूर सारख्या ग्रामीण भागात वास्तव्य करून सोलार सिस्टीम सारख्या गरजेच्या आणि आधुनिक क्षेत्रात सन २००१ पासून श्रीकृष्ण एंटरप्रायजेस २४ सोलार एनर्जीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात कार्य करणा-या अमर श्रीनिवास अकनगिरे आणि राहूल उरगुंडे या तरुणांच्या सौरऊर्जा क्षेत्रातील कार्याबद्दल मराठवाडा आयकॉन पुरस्काराकरिता निवड करण्यात आली. त्यांच्या बरोबरच इतर क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणा-या मराठवाड्यातील कर्तृत्ववान व्यक्तींची मराठवाडा आयकॉन पुरस्कार २०२५ करिता निवड करण्यात आली होती. या सर्वांचा सन्मान छत्रपती संभाजीनगर येथे ३ मे रोजी करण्यात आला . या सोहळ्यासाठी ए. श्रीनिवास , राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, मागासवर्गीय बहुजन विकास मंत्री अतुल सावे, मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ. विक्रम काळे, संभाजी नगरचे आयुक्त जी. श्रीकांत, कालिका स्टीलचे यश गोयल हे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR