28.1 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeराष्ट्रीयगायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा

गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा

योगी आदित्यनाथ यांचे आदेश

लखनौ : उत्तर प्रदेशातील शासकीय कार्यालये आता बाजारातील वेगवेगळ्या कंपन्यांच्या पेंटने रंगवली जाणार नाहीयेत. त्यासाठी आता गायीच्या शेणापासून बनवलेला रंग वापरला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीच यासंदर्भातील आदेश एका बैठकीत दिले आहेत.

पशुपालन आणि दुग्धविकास विभागाच्या अधिका-यांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठक घेतली. या बैठकीत आदित्यनाथ यांनी सांगितले की सरकारी कार्यालयांना गायीच्या शेणापासून नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या रंगवण्यात यावे. राज्यातील विनाअनुदानित गोवंश संरक्षण केंद्रांना आत्मनिर्भर बनवण्याची गरज आहे.

या केंद्रांमध्ये शेणाच्या चांगल्या पद्धतीने उपयोग केला जातो. त्यापासून नैसर्गिक रंग देण्यासाठी प्रोत्साहन दिले जावे. त्याचबरोबर या केंद्रांमध्ये नैसर्गिक खाद्य आणि गौ आधारित उत्पादने निर्मित करण्यासाठी कृती कार्यक्रम बनवण्यात यावा. शेणापासून बनवण्यात येणा-या रंगाचे उत्पादन केंद्रेही वाढवण्यात यावीत, असेही योगी आदित्यनाथ यांनी अधिका-यांना सांगितले.

अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार गायीच्या शेणापासून तयार केला जाणारा, रंग हा पूर्णपणे नैसर्गिक असतो. तो पर्यावरण अनुकूलच नाही, तर भिंतींवरही उठून दिसतो. त्यात कोणत्याही प्रकारचे रासायनिक घटक मिसळले जात नाहीत. त्यामुळे आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होत नाही. तो बनवण्यासाठी विजेचाही कमी वापर होतो.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR