मुंबई : तरुणांमध्येही हल्ली व्हेरिकोज व्हेन्सची समस्या डोके वर काढत आहे. यामध्ये रुग्णांना पाय दुखणे, जडपणा येणे आणि पायाच्या शिरा फुगलेल्या दिसून येतात. बैठी जीवनशैली, तासनतास एकाच स्थितीत बसून करावे लागणारे काम, सतत उभे राहावे लागणे, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, गर्भधारणा आणि जागरूकतेचा अभाव, ही व्हेरिकोज व्हेन्सची प्रमुख कारणे ठरत आहेत.
जर वेळीच उपचार केले नाहीत तर ते अल्सर किंवा शिरी फुटण्सासारख्या गंभीर गुंतागुंत निर्माण करू शकतात. व्हेरिकोज व्हेन्सचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. डॉ. अशांक बन्सल, एक प्रसिद्ध एंडोव्हस्कुलर सर्जन असून त्यांची टीम एंडोव्हेनस लेसर थेरपी सारख्या आधुनिक आणि मिनीमली इन्व्हेसिव्ह तंत्रांचा वापर करून प्रभावी उपचार करते. या उपचारांमुळे रुग्णांना जलद पुनर्प्राप्ती, कमीत कमी वेदना आणि दीर्घकालीन आराम मिळतो. युनायटेड किंग्डममधील ५२ वर्षीय शिक्षिका रूथ स्कॉलिंग यांना पाच ते सहा महिन्यांपासून व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास सतावत होता.
त्यांची प्रकृती इतकी गंभीर झाली होती की त्यांना चालणे किंवा उभे राहणे देखील शक्य होत नव्हते. ती गेल्या ३ वर्षांपासून यूकेमध्ये (नॅशनल हेल्थ सिस्टीम) अंतर्गत उपचार घेण्यासाठी वाट पाहत होती, परंतु शस्त्रक्रियेची तारीख निघून गेल्याने ती निराश झाली. त्यानंतर ती उपचार घेण्यासाठी भारतात आली. कलर डॉपलर चाचणीने दुहेरी व्हेरिकोज व्हेन्सचे (दोन्ही पायांमध्ये व्हेरिकोज व्हेन्स) निदान झाले. (एंडोव्हस्कुलर लेसर ट्रीटमेंट) ही एक दुर्बींणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. ज्यामध्ये लेसर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
समस्या होण्यामागचे कारण काय?
डॉ. अशांक बन्सल सांगतात की, व्हेरिकोज वेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये रक्त एकाच ठिकाणी जमा होते. यामुळे आपल्या शिरा फुगतात आणि पायात प्रचंड वेदना निर्माण होते. दीर्घकाळ उभे राहिल्याने किंवा चालण्यामुळे पायांवर ताण येतो. दीर्घकाळ उभे राहणे, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, हार्मोनल बदल, गर्भधारणा आणि वय हे व्हेरिकोज वेन्सला कारणीभूत घटक आहेत. व्हेरिकोज वेन्सच्या लक्षणांमध्ये सहसा वेदना होणे, स्रायुंमधील जडपणा, सूज आणि फुगलेल्या शिरा अशी लक्षणे दिसून येतात. जर वेळीच उपचार न केले तर त्यामुळे पायात अल्सर, संसर्ग, त्वचेचा रंग बदलणे किंवा अगदी शिरा फुटण्यासारखी गुंतागुंत होऊ शकतात. आमच्या क्लिनिकमध्ये, आम्ही दर आठवड्याला अशा सुमारे ३०-४० रुग्णांवर उपचार करतो, तिशीतील तरुणांमध्ये ही समस्या वाढत असून यामध्ये वेदना, खाज सुटणे, सूज येणे आणि पायातील जडपणा अशा लक्षणे आढळतात.
आजार टाळण्यासाठी उपाय
ही स्थिती टाळण्यासाठी, नियमित पायांची हालचाल करा, जास्त वेळ उभे राहणे टाळा, वजन नियंत्रित राखा आणि कॉम्प्रेशन स्टॉकिंग्जचा वापर करा. सध्या, ईव्हीएलटी सारखे प्रभावी उपचार पर्याय उपलब्ध आहेत. व्हेरिकोज वेन्सची समस्या घेऊन रुग्णालयात दाखल होणा-या रुग्णांची संख्या पूर्वी १० ते १२ इतकी होती. मात्र आता त्यात तिपटीने वाढ झाली असून ही संख्या जवळजवळ ३०-४० रुग्णांमध्ये आढळते. बैठी जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव हे यामागचे मुख्य कारण ठरत आहे.