32.7 C
Latur
Wednesday, May 7, 2025
Homeक्रीडाअखेरच्या चेंडूवर गुजरातचा थरारक विजय

अखेरच्या चेंडूवर गुजरातचा थरारक विजय

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई आणि गुजरात यांच्यातील सामन्यात पावसाचे आगमन झाले आणि रंगत वाढली. पावसानंतर गुजरातच्या शुभमन गिलला जसप्रीत बुमराहने बाद केले आणि सामना मुंबईच्या दिशेने फिरायला सुरुवात झाली. त्यानंतर ट्रेंट बोल्टने अजून एक विकेट काढली आणि मुंबईच्या संघाने गुजरातला बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर १८ षटके पूर्ण झाल्यावर पुन्हा सामना पावसामुळे थांबला. त्यावेळी गुजरातला विजयासाठी एका षटकात १५ धावांचे आव्हान दिले होते. गुजरातने या षटकात १५ धावा केल्या आणि डकवर्थ लुइस नियमानुसार तीन विकेट्स राखून विजय साकारला. अखेरच्या चेंडूवर गुजरातला एक धाव हवी होती. त्यांनी ती पूर्ण करत विजय साकारला.

मुंबईच्या १५६ धावांचा पाठलाग करताना शुभम गिल दमदार फलंदाजी करत होता. पण पाऊस पडला आणि त्यानंतर जसप्रीत बुमराहने त्याला ३८ धावांवर असताना क्लीन बोल्ड केले. त्यानंतर विल जॅक्स आणि सूर्यकुमार यादवने ७१ धावांची भागीदारी केली. मात्र त्याची भरपाई त्यानंतर गुजरात टायटन्सने करताना मुंबई इंडियन्सला त्यांच्या घरच्या मैदानात चौकार षटकारांपासून रोखले. अखेरच्या षटकांत १८ धावा झाल्यामुळे मुंबईला १५६ धावांचे आव्हान देता आले.

त्यानंतर मुंबईने पहिल्या दहा षटकांत १० चौकार आणि दोन षटकारांसह ८९ धावा केल्या. परंतु त्यानंतरच्या १० षटकांत ६६ धावा करता आल्या. त्यात चार चौकार आणि तीन षटकार होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात पावसाने अडथळा केला आणि लुईस डकवर्थच्या नियमाप्रमाणे एका षटकात गुजरातला १५ धावा करायच्या असताना त्यांनी ते आव्हान पेलले आणि अखेरच्या चेंडूवर एक धाव घेत गुजरातने विजय मिळविला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR