33.8 C
Latur
Sunday, May 11, 2025
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते माधव वझे यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
मराठी आणि हिंदी चित्रपटांतून त्यांनी अनेक भूमिका केल्या तसेच लेखन केले आहे. सन १९५३ मध्ये त्यांनी ‘श्यामची आई’ चित्रपटात बाल कलाकार म्हणून भूमिका साकारली.

त्यानंतर मराठी रंगभूमीवर त्यांनी भूमिका साकारल्या. त्याचप्रमाणे विविध नाट्य प्रयोगाचे दिग्दर्शन त्यांनी केले. नाट्य संघाच्या अधिवेशनात त्यांनी शोध निबंध सादर केले आहेत.

नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी वाडिया महाविद्यालयात इंग्रजी भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केले. नाट्य, चित्रपट क्षेत्रातील कामगिरीबाबत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR