30.4 C
Latur
Thursday, May 8, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहि­णींना २१०० रुपये मिळणार

लाडक्या बहि­णींना २१०० रुपये मिळणार

नाशिक : प्रतिनिधी
राज्य सरकारची लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते. लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मे महिन्याचा हप्ता कधी येणार हा प्रश्न तर महिला विचारतच आहेत. दरम्यान, २१०० रुपयांबाबत महायुतीचे नेते छगन भुजबळांनी लवकच वाढीव हप्ता मिळेल असे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास उशीर का होतो यावर भाष्य केले आहे. लाडकी बहीण योजनेत अडचणी आहेत. घरात एखाद्या वेळी खर्च वाढतो तसेच आहे. काही वेळा उशिरा पैसे येतात. शासकीय पैसे कुठेही जात नाहीत. लाडकी बहीण, लेक लाडकी योजनेचे पैसे इकडे गेले-तिकडे गेले तेव्हा इतर मंत्री ठणाणा करतात. लाडक्या बहि­णींना त्यांचे पैसे मिळणार आहेत. १५०० रुपये व्यवस्थित मिळाले की २१०० पण मिळतील. नवीन योजना आहे. शंका-कुशंका उपस्थित करू नयेत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

आता लाडक्या बहि­णींना २१०० रुपये मिळतील, असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर महिलांना २१०० रुपये मिळणार असल्याचेही महायुती सरकारने सांगितले आहे. त्यामुळे आता राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची महिलांना वाट पाहावी लागणार आहे. २१०० रुपयांबाबत अधिकृत घोषणा कधी होईल, याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR