28.4 C
Latur
Friday, May 9, 2025
Homeमहाराष्ट्रसंघ मोदी आणि सैन्याच्या सोबत

संघ मोदी आणि सैन्याच्या सोबत

अधिकृत स्टेटमेंट जारी सरकारच्या सर्च सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

नागपूर : भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. आरएसएसच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिकृत स्टेटमेंट मध्ये देशवासीयांनी सरकारच्या सर्व सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपले नागरी कर्तव्य बजावताना, सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे देशविरोधी शक्तींचे कोणतेही षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असे आवाहन देखील संघाने केले आहे. राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश तन, मन आणि धनाने सरकार आणि सशस्त्र दलासोबत उभा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पहलगामच्या भ्याड दहशतवादी घटनेनंतर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या समर्थक परि संस्थेविरुद्ध ऑपरेशन सिंदूर ही निर्णायक कारवाई केल्याबद्दल भारत सरकार आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाचे हार्दिक अभिनंदन. हिंदू यात्रेकरूंच्या क्रूर हत्याकांडातील पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय मिळवून देण्यासाठी करण्यात येणा-या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि धैर्य वाढले आहे. आमचा असाही विश्वास आहे की, पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर, त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थन यंत्रणेवर केली जात असलेली लष्करी कारवाई ही देशाच्या सुरक्षेसाठी एक आवश्यक आणि अपरिहार्य पाऊल आहे. राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश तन, मन आणि धनाने सरकार आणि सशस्त्र दलासोबत उभा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR