कराची : वृत्तसंस्था
बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा झाला तर मोठा झटका पाकिस्तानला बसणार आहे. पाकिस्तानमधील सोने आणि तांबे यांचे भांडार संपणार आहे. एका अंदाजानुसार, पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये ५.९ बिलियन टन खनिज, सोने आणि तांबे आहे.
बलुचिस्तान पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत आहे. अफगाणिस्तान सीमेला लागून असलेला हा भूभाग पाकिस्तानसाठी रणनैतिकदृष्टीने महत्वाचा आहे. इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेजवळ बलुचिस्तानचे स्थान असल्याने हा प्रदेश पाकिस्तानसाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. बलुचिस्तानमध्ये सोने, तांबे, प्राकृतिक गॅस यासारखे खनिज आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळतो. परंतु हा भाग पाकिस्तानपासून वेगळा झाला तर पाकिस्तानात गंभीर आर्थिक संकट आहे.
बलुचिस्तान हे खनिजाचे भांडार म्हणून ओळखले जाते. बलुचिस्तान प्रदेश ३,४७,१९० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा आहे. तो पाकिस्तानच्या एकूण भूभागाच्या अंदाजे ४४ टक्के आहे. बलुचिस्तानची लोकसंख्या अंदाजे १.४९ कोटी आहे. पाकिस्तानच्या नैसर्गिक वायू पुरवठ्यात हा प्रांत महत्त्वाची भूमिका बजावतो. बलुचिस्तान गेल्यावर पाकिस्तानला ऊर्जा संकटाचा सामना करावा लागेल. प्रदेशात ५९ अब्ज टन खनिज साठे आहेत. ज्यात जगातील सर्वात मोठे सोन्याचे साठे झ्र ६० दशलक्ष औंस सोने (सुमारे १,७०० टन) यांचा समावेश आहे. बलुचिस्तानमध्ये तांब्याचे प्रचंड साठे आहेत. ज्याची एकूण किंमत अंदाजे १७४.४२ लाख कोटी रुपये आहे.
ब्लूमबर्गच्या एका रिपोर्टनुसार, बलुचिस्तानमध्ये असणारी रेको डिक जगातील सर्वात मोठी अविकसित तांबे आणि सोन्याची खाण आहे. परंतु पाकिस्तान सरकार, बॅरिक गोल्ड आणि एंटोफगास्टा पीएलसी यांच्यातील वादामुळे या खाणीतून सोने काढण्यास सुरुवात झाली नाही.