24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहागाई, बेरोजगारी, शेतक-यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक

महागाई, बेरोजगारी, शेतक-यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक

नागपूर : महागाई, बेरोजगारी, शेतक-यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक होताना पाहायला मिळत असून, नागपूर विधानभवनावर ‘हल्लाबोल’ मोर्चा काँग्रेसच्या वतीने काढण्यात येणार आहे. सोमवारी (११ डिसेंबर) रोजी विधानभवनावर हा मोर्चा धडकणार आहे. विदर्भातील नागरिकांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. ‘खोकेबाज, धोकेबाज, चालबाज सरकारच्या विरोधात मोर्चा’ अशी टॅगलाईन या मोर्चाला देण्यात आली आहे.

राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोक-या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रगमाफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणीत शिंदे सरकार जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून विदर्भात फक्त पर्यटनाला आलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा भव्य ‘हल्लाबोल’ मोर्चा सोमवारी काढण्यात येणार असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन दिवसांच्या कामकाजात सरकारने शेतक-यांच्या प्रश्नांवर चर्चाही केली नाही. केवळ शेतक-यांना भरपूर दिले आहे अशा पोकळ घोषणा मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री देत आहेत. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार शेतक-यांच्या बांधावर जाऊन फोटोसेशन करून आले पण अजून कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. याआधीच्या नुकसानीची मदतही अजून शेतक-यांना मिळालेली नाही. पीकविम्याचे पैसेही मिळालेले नाहीत. राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळलेली आहे. अपहरण, हत्या, महिला अत्याचारात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याचे ठउफइ च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे

. पण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र अहवाल कसा वाचायचा, याचे ज्ञान पाजळून मूळ मुद्याला बगल देत आहेत. राज्यात विविध खात्यांतील २.५ लाख पदे रिक्त आहेत पण सरकार नोकर भरती करत नाही. लाखो विद्यार्थी नोकरीची प्रतीक्षा करत आहेत पण सरकार परीक्षाही घेत नाही. सरकारच्या वेळकाढूपणामुळे लाखो मुलांची वयोमर्यादा निघून जात आहे, त्यामुळे या सर्व प्रश्नांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. कुणाल पाटील, माजी मंत्री, आमदार, खासदार, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयूआय, विविध सेल व विभागाचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR