32.7 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeमहाराष्ट्रसरकारने सिमला करार रद्द केला का?

सरकारने सिमला करार रद्द केला का?

अमेरिकेच्या मध्यस्थीवरून पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

पुणे : पहलगाम घटनेनंतर दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकारने आक्रमक पावले उचलली. त्याला सर्वच पक्षांनी पाठिंबा दिला. देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक अमेरिकेच्या मध्यस्थीचे वृत्त आले आणि दोन्ही देशांकडून शस्त्रसंधी झाल्याचे जाहीर करण्यात आले. पण, यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे शिमला कराराचा.

भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांनी केलेल्या या करारानुसार तिस-याची मध्यस्थी अमान्य होती. मग आता जे घडले त्यानुसार केंद्र सरकारने शिमला करार रद्द केला आहे का? की त्यात काही बदल करून शस्त्रसंधी करण्यात आली, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला केला आहे. यावर जनतेला उत्तर द्यावे, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

पुणे पत्रकार कट्ट्याच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (दि. ११) रानडे
इन्स्टिट्यूट येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. संवादाच्या माध्यमातून काम करणे ही काळाची गरज आहे. संवादाचा वापर विसंवादासाठी होत असतो तेव्हा जबाबदारी अधिक वाढते असा कट्टा अभावाने होतो, कट्टी फार होतात. अभिव्यक्तीची गळचेपी होते, तेव्हा सर्जनशीलतेला बहर येतो हा इतिहास प्रत्यक्षात आला पाहिजे, अशा अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR