नागपूर : जिल्ह्यातील उमरेड तालुक्याती सुरगाव शिवार इथे धक्कादायक घटना घडली आहे. जुन्या खाणीतील पाण्याने भरलेल्या खड्डयात बुडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचा व पथकाचे मदतीने पाण्यातून मृतदेह करण्यात आले आहेत. मृतांमध्ये एक पुरुष, २ महिला आणि २ किशोरवयीन बालकांचा समावेश आहे.
ही दुर्घटना आहे की सामूहिक आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. पाण्याने भरलेल्या खड्डयात बुडून ५ जणांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने ही दुर्घटना आहे की आत्महत्या असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसर हादरुन गेला आहे. तसेच यामुळे हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
मृतांची नावे
एहतेशाम अन्सारी, २६ वर्ष
रोशनी चौधरी, ३२ वर्ष
अंजली चौधरी, २५ वर्ष
मोहित चौधरी, १० वर्ष
लक्ष्मी चौधरी, ८ वर्ष