26.1 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeराष्ट्रीयजनऔषधी योजनेमुळे लोकांची ७४१६ कोटींची बचत; केंद्राचा दावा

जनऔषधी योजनेमुळे लोकांची ७४१६ कोटींची बचत; केंद्राचा दावा

नवी दिल्ली : देशभरातील १० हजाराहून अधिक जनऔषधी केंद्रांनी लोकांची या आर्थिक वर्षात सुमारे ७,४१६ कोटी रुपयांची बचत करण्यात मदत केली, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. राज्यसभेत ही माहिती देताना रसायने आणि खते राज्यमंत्री भगवंत खुबा म्हणाले की, गेल्या ९ वर्षांत या योजनेमुळे वार्षिक विक्रीत १५० पटीने अभूतपूर्व वाढ झाली आहे. तसेच खुबा म्हणाले की, ही योजना वेगाने वाढत आहे. गेल्या नऊ वर्षांत या योजनेंतर्गत नागरिकांची एकूण २३,००० कोटी रुपयांहून अधिक बचत झाल्याची शक्यता आहे.

जनऔषधी केंद्रांना दररोज सरासरी १०-१२ लाख लोक भेट देतात. या वर्षी नोव्हेंबरपर्यंत देशातील ७५३ जिल्ह्यांमध्ये १०,००६ जनऔषधी केंद्रे उघडण्यात आली आहेत. गेल्या आर्थिक वर्षात, फार्मास्युटिकल्स अँड मेडिकल डिव्हायसेस ब्युरो ऑफ इंडियाने (पीएमबीआय) १,२३६ कोटी रुपयांच्या जनऔषधी औषधांची विक्री केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास ४० टक्क्यांहून अधिक आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR