27.9 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रसीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर

सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर

१० वीचा निकालही लवकरच लागण्याची शक्यता

नागपूर : आज महाराष्ट्रात एसएससी बोर्डाचा १० वीचा निकाल जाहीर झाला. याचबरोबर आज सीबीएसई बोर्डाने देखील १२ वीचा निकाल जाहीर केला आहे. सीबीएससीच्या १२ वीचा निकाल ८८.३९% लागला आहे. विद्यार्थी, पालक हा निकाल cbse.gov.in, results.cbse.nic.in वर जाऊन पाहू शकतात.

सीबीएसई १२ वीची १७.८८ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. तर १० वीचे मिळून एकूण ४२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. गेल्या वर्षीपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ०.४१% ने वाढले. तर मुलींनी मुलांपेक्षा ५.९४% पेक्षा जास्त गुणांनी आघाडी घेतली आहे. ९१% पेक्षा जास्त मुलींनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

सीबीएसई बोर्ड कोणतीही मेरीट लिस्ट जारी करत नाही, तसेच टॉपर कोण याचीही घोषणा करत नाही. तसेच सर्व शैक्षणिक संस्थांनाही कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत किंवा जिल्ह्यात टÞॉपर घोषित करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. सीबीएसईचा १० वी चा निकालही लवकरच लागण्याची शक्यता आहे. हे निकाल डिजिलॉकर, उमंग अ‍ॅप आणि एसएमएसद्वारेही पाहता येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल गेल्याच आठवड्यात जाहीर केला होता. राज्यात पुन्हा एकदा कोकण विभागाने ९६.७४ टक्के घेत बाजी मारली आहे. लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८९.४६ टक्के लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला असून, यात गतवर्षापेक्षा १.४९ टक्के घट झाली आहे. ९ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेला एकूण १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते, त्यापैकी १३ लाख ०२ हजार ८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कॉलेज प्रवेशांना सुरुवात होणार
या दोन्ही निकालांनंतर आता लगेचच पदवी अभ्यासक्रमांना सुरुवात होणार आहे. पालकांना आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी मोठी धावपळ करावी लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR