31.9 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

महाराष्ट्रात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी

पोलिस कंट्रोल रुमला ई-मेल शोधमोहीम सुरू

मुंबई : पुढच्या दोन दिवसांत बॉम्बस्फोट होईल, असा धमकीचा ईमेल महाराष्ट्र पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाला आहे. या धमकीच्या ईमेलनंतर मुंबईसह अनेक शहरांमध्ये पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रशासनाने या धमकीला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा ईमेल मिळाला आहे. या मेलमध्ये असे म्हटले आहे की, पुढील २ दिवसांत एक मोठा बॉम्बस्फोट होणार आहे. नियंत्रण कक्षाने हा मेल मुंबई पोलिसांना पाठवला आहे. ईमेल मिळाल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिस प्रशासनाने या ईमेलला गांभीर्याने घेण्याचा इशारा दिला आहे. सध्या पोलिस सदर ईमेल आयडी ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. ईमेल पाठवणा-याचे स्थान देखील अद्याप ट्रॅक झालेले नाही. मात्र, यानंतर मुंबई पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसोबतच, ईमेल पाठवणा-या व्यक्तीचाही शोध घेतला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR