27.9 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यावर ‘डेटा हॅक’ होण्याचे संकट

राज्यावर ‘डेटा हॅक’ होण्याचे संकट

‘ऑपरेशन सिंदूर’चे फोटो, व्हीडीओ डाऊनलोड करणे महागात पडणार

पुणे : भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षात दोन्ही देशांनी शस्त्रसंधी स्वीकारली असली तरी पाकिस्तानच्या ‘नापाक’ इराद्यांबद्दल सांगता येत नाही. सध्या भारत-पाकिस्तान मधल्या संघर्षाची स्थिती काय आहे? ‘ऑपरेशन सिंदूर’ काय आहे? हे जाणून घेण्यासाठी भारतातील नेटिझन्स हल्ल्यांचे फोटो, व्हीडीओ, डाऊनलोड करून बघत असून सोशल मीडियावर डान्स ऑफ द हिलरी आणि ऑपरेशन सिंदूर इनसाइट्स.पीडीएफ अशा काही पेलोड्सदेखील शेअर झाल्या असल्याने राज्यातील यूजर्सचा डेटा हॅक होण्याचे संकट आहे. अशावेळेस नेटकरींनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

तज्ज्ञांच्या मते पेलोड्स उघडल्या तर तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉप्समधील डेटा हॅक होऊ शकतो. या माध्यमातून पाकिस्तान भारताविरुद्ध सायबर युद्ध छेडण्याचा प्रयत्न करू शकतो, असा इशारा सायबरतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. आता सर्व भारतीयांना ‘ऑपरेशन सिंदूर’ काय आहे, हे जाणून घेण्याची इच्छा आहे. लोक व्हीडीओ किंवा फोटो डाऊनलोड करून बघत आहेत. सोशल मीडियावर काही पेलोड्स शेअर केल्याच्या बातम्या आहेत. जर तुम्ही हे पेलोड्स उघडले तर तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉप्समधील डेटा हॅक होऊ शकतो. यासाठी अनोळखी लोकांकडून आलेले पीडीएफ, फोटो किंवा व्हीडीओ ओपन करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा एखाद्या सेलिब्रिटीजचे डीपफेक व्हीडीओ तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे अशा व्हीडीओंना बळी पडू नका असे आवाहन डॉ. रोहन न्यायाधीश यांनी केले आहे.

पेलोड कसा पसरतो?
पेलोड कायदेशीर फायलींच्या नावाखाली प्रसारित केला जात असल्याचे वृत्त आहे, विशेषत: व्हिडीओ किंवा कागदपत्रे. या फायली वारंवार एक्सटेंशनसह येतात आणि पहिल्या दृष्टिक्षेपात निरुपद्रवी दिसतात. एकदा क्लिक केल्यानंतर, ते डिव्हाइसवर कोड स्थापित करू शकतात, ज्यामुळे रिमोट अ‍ॅक्सेस आणि डेटा चोरी होऊ शकतो.

पेलोड काय करू शकते ?
– बँकिंग क्रेडेन्शियल्स आणि पासवर्डसह संवेदनशील वैयक्तिक डेटा काढणे.
– सिस्टम फाइल्समध्ये अनधिकृत प्रवेश मिळवणे.
– संक्रमित डिव्हाइसेसचे रिमोट कंट्रोल सक्षम करणे.

सुरक्षिततेचे उपाय
– सेटिंग्ज- स्टोरेज- मीडिया ऑटो डाऊनलोड; ऑटो मीडिया डाऊनलोड बंद करावे.
– मजबूत पासवर्ड वापरावे.
-मल्टी फॅक्टर सत्यापन चालू करावे.
– संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये.
– तुमच्या महत्त्वाच्या फाइल्सचा बॅकअप घ्यावे.
– केवळ अधिकृत आणि परवानाकृत सॉफ्टवेअर वापरावे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR