29.4 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeमहाराष्ट्रशासकीय विश्रामगृहात सामूहिक बलात्कार

शासकीय विश्रामगृहात सामूहिक बलात्कार

प्राचार्य, ६५ वर्षांवरील व्यक्तींवर गुन्हा आव्हाडांचा खुलासा

मुंबई : ६ तारखेला एक सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यातील काही आरोपी हे ६५ वर्षावरील आहेत. त्यामध्ये एक प्राचार्यही आहे. या गुन्ह्यात शासकीय विश्रामगृहाचा वापर करून तिथे ६ दिवस सातत्याने त्या महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. या विषयी त्यांनी ट्विटरला एक पोस्ट शेअर केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की खरंतर हा गुन्हा नोंदविताना तेथील सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्वाचा पुरावा ठरतो. प्रत्येक शासकीय विश्रामगृहात शासनाच्या आदेशाने सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. या सीसीटीव्हीचे फुटेज न तपासता, केवळ राजकीय वैमनस्यातून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम हा गुन्हा नोंदवून पोलिसांनी केलेले आहे.

दबावातून गुन्हा दाखल
माझे असे मत आहे की, पोलिसांचाही यामध्ये नाईलाज झाला आहे. कारण, सुरूवातीला पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला होता. मात्र, वरून दबाव आल्यानंतर हा गुन्हा नोंदविला. यामध्ये अनेक बाबी अशा आहेत की त्या संशयास्पद आहेत असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

चौकशीची मागणी
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. उगाच गोरगरीबांचे चारित्र्यहनन करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम करू नये. उद्या यातून एखाद्याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली तर यास जबाबदार कोण? असा सवाल देखील आव्हाड यांनी विचारला आहे. तसेच आपली पोस्ट सीएमओ महाराष्ट्र आणि डीजीपी महाराष्ट्र यांना टॅग केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR