27.2 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरबीडमध्ये गतीमंद चिमुकलीला जनावरांच्या गोठ्यात बांधले

बीडमध्ये गतीमंद चिमुकलीला जनावरांच्या गोठ्यात बांधले

बापाचे पाशवी कृत्य

बीड : जिल्ह्यातील गेवराई शहरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यसनी बापाने स्वत:च्याच गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबल्याचे समोर आले आहे. आईच्या मृत्यूनंतर अक्षरश: केळी, टरबुजाच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणीच बापाने मृत्यूच्या वेदना मुलीला दिल्या. मात्र, एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून तिची सुटका केली.

पैठणच्या हिना नामक महिलेला माहेरी गेलेली असताना हा प्रकार लक्षात आला. रिहानाची अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला आणि तिने मुलीची सूटका केली. बाल कल्याण समितीकडून सध्या मुलीवर उपचार सुरू आहेत.

बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात आईच्या मृत्यूनंतर पाच वर्षांची गतिमंद मुलीला वडिलांच्या अमानुष वागणुक दिली. व्यसनी बापाने तिला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले होते. तिला अक्षरश: केळी, टरबुजाच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणी मृत्यूच्या वेदना दिल्या. मात्र, एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून तिची सुटका केली.

पैठणच्या हिना नामक महिलेला हे समजले. हिना माहेरी गेलेली असताना तिला सतत रडण्याचा आवाज येत होता. तिने गोठ्यात जाऊन पाहिल्यावर रिहाना दिसली. रिहानाची अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला. हिना यांनी हज हाउसजवळील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात तिला नेऊन सोडले. खालिद यांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, आश्रमात सर्व मुलेच असल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर दामिनी पथकाची मदत घेतली. दामिनी पथकाच्या मदतीने कायदेशीर पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR