28.4 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeलातूरसहा जणांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीपत्र प्रदान

सहा जणांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीपत्र प्रदान

लातूर : प्रतिनिधी
महसूल विभाग आणि सामूहिक अनुकंपा प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या निर्णयानुसार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते सहा जणांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये पाच जणांना ग्राम महसूल अधिकारी व एका उमेदवाराला महसूल सहायक पदावर नियुक्ती देण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा माहिती व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुक्मे, नायब तहसीलदार सुधीर बिराजदार, अव्वल कारकून डी. एन. शिंदे, हनमंत मुदाने, नामदेव बिराजदार आणि राहुल ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती. सामान्य प्रशासन विभागाच्या २२ डिसेंबर २०२१ च्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्त्वावरील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील सामूहिक अनुकंपा प्रतिक्षा यादी आणि महसूल विभागाच्या अनुकंपा प्रतिक्षा यादीवरील एकूण सहा उमेदवारांना गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली.
यामध्ये गणेश रमेश साळुंके, मनीषा बालाजी पाटील, साक्षी शिवमूर्ती तलवारे, नागभूषण विजय कांबळे आणि नेहल अंकुश सूर्यवंशी यांना ग्राम महसूल अधिकारी पदावर, तर सोमनाथ वैजनाथ हुडगे यांना महसूल सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात आली. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सर्वांना नियुक्तीपत्र प्रदान केली, तसेच त्यांना भारतीय राज्यघटनेची प्रत भेट देवून शासकीय सेवेतील कामासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR