31.4 C
Latur
Friday, May 16, 2025
Homeमहाराष्ट्रसंजय राऊत अतिरेकी

संजय राऊत अतिरेकी

मंत्री महाजन यांच्याकडून उल्लेख

मुंबई : संजय राऊत यांचा अतिरेकी म्हणून उल्लेख करीत पुस्तकातील एका पॅ-यावरून मंत्री महाजन यांनी फटकारले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची ईडी कोठडी आणि जेलमधील वास्तव्य यांच्या अनुभवावर आधारित असलेले ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे.

राऊतांनी या पुस्तकातून विविध विषयांवर भाष्य केलं असून एका भागात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दलही दावा केला आहे. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली होती. नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलीप्रकरणी एक आरोपी होते, शरद पवार यांच्यामुळे मोदींची अटक टळली, तर तडीपार असलेल्या अमित शाहांनाही बाळासाहेब ठाकरेंनी मदत केल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. पण त्यांच्या या दाव्यांवर भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. तसेच राऊत यांचे दावे महाजन यांनी फेटाळून लावले आहेत.

संजय राऊत यांच्या बद्दल काय बोलावे? ते काय बोलतात आता ते कोणी ऐकत सुद्धा नाही. वाटेल तसे ते फालतू बडबड करत असतात. युद्ध सुरू असताना मोदींनी राजीनामा द्यावा, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊत करत होते. सैनिकांबद्दल काहीही बोलत होते. मला वाटते आता या माणसाला कोणीच गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेले बरें असे मला वाटते असे गिरीश महाजन म्हणाले. महाजन मीडियाशी संवाद साधत होते.

आम्ही ख-या शिवसेनेसोबत
बाळासाहेबांनी मोदी आणि शाह यांना मदतीचा हात दिला असेल तर चांगलंच आहे. आम्ही आता ख-या शिवसेनेसोबत आहोत. आधी पण शिवसेनेसोबत होतो आणि आता सुद्धा ख-या शिवसेने आजही सोबत आहोत. आजही आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांसोबत आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्ही आजही टिकवलेले आहेत. आम्ही ख-या शिवसेने सोबत आहोत. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्या शिवसेनेसोबत नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देणा-या शिवसेनेसोबत आम्ही नाही. पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. आज त्यांची परिस्थिती काय झाली आहे. त्यामुळे त्यांना रोज सकाळी अशी बडबड करावे लागते, अशी टीका महाजन यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR