32.8 C
Latur
Saturday, May 17, 2025
Homeराष्ट्रीयभारत-तालिबान जवळीक; पाकची वाढली डोकेदुखी

भारत-तालिबान जवळीक; पाकची वाढली डोकेदुखी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान पाकची अवस्था खूप बिकट झाली आहे. एकीकडे, कर्ज आणि पाण्याची कमतरता पाकिस्तानसाठी समस्या बनत आहेत, तर दुसरीकडे भारत आणि अफगाणिस्तानमधील वाढती मैत्री पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे, अफगाणिस्तानने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला असून, ते याप्रकरणी भारतासोबत उभे असल्याचे दिसून येते.
गेल्या काही काळापासून तालिबान सरकार भारतासोबत द्विपक्षीय संबंध वाढवत आहे. गेल्या ५ महिन्यांत दोन्ही देशांनी ३ पेक्षा जास्त वेळा चर्चा केली आहे. अफगाणिस्तान आणि भारतमधील जवळीकतेमुळे पाकिस्तानची डोकेदुखी वाढत आहे.
यासोबतच, जयशंकर यांनी भारत आणि अफगाणिस्तानमधील संबंध बिघडवण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांच्या मुद्द्यावर तालिबान सरकारच्या भूमिकेचे कौतुक केले. पाकिस्तानचे नाव न घेता त्यांनी त्याकडे लक्ष वेधले आणि म्हणाले, खोट्या आणि निराधार वृत्तांद्वारे भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अविश्वास निर्माण करण्याच्या प्रयत्नांना अफगाणिस्तानने स्पष्पटपणे नाकारल्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. अफगाणिस्तानातील लोकांशी असलेली आमची पारंपारिक मैत्री आणि विकास सहकार्यासाठी एकमेकांशी असलेले आमचे सततचे सहकार्य यावरही प्रकाश टाकण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR