मुंबई : अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या कायमच त्याच्या वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. सध्या शाहरुख त्याचा आगामी चित्रपट किंग मुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून तो लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, नुकतीच या चित्रपटासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर येते आहे. नायक, खलनायकाच्या नावावरून पडदा हटवल्यानंतर ‘किंग’ मध्ये आता आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. ही अभिनेत्री म्हणजे राणी मुखर्जी आहे. जवळपास १९ वर्षानंतर राणी मुखर्जी आणि शाहरुख पुन्हा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
दरम्यान, बहुचर्चित किंग चित्रपटात शाहरुख खानसह सुहाना खान, दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, अभय वर्मा, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ आणि अर्शद वारसी हे कलाकार सुद्धा पाहायला मिळणार आहेत.पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, राणी मुखर्जी शाहरुख खानच्या किंगमध्ये दिसणार आहे. राणी मुखर्जी चित्रपटात कॅमिओ करणार आहे. परंतु तिची ही भूमिका देखील तितकीच महत्वाची आहे. जवळपास १९ वर्षानंतर बॉलिवूडची ही लोकप्रिय जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आता प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. परंतु याबाबत चित्रपटाचे निर्माते किंवा कलाकरांनी देखील कोणताही अधिकृत माहिती दिलेली नाही.
राणी मुखर्जी आणि शाहरुख खान यांनी ‘कुछ कुछ होता है’, ‘चलते चलते’, ‘पहेली’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘वीर-जारा’ आणि ‘कभी अलविदा ना कहना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले आहे. त्याचबरोबर ‘कभी अलविदा ना कहना’ या चित्रपटात ते शेवटचे एकत्र दिसले. आता १९ वर्षांनंतर पुन्हा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.