बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे. या हत्यानंतर बीड जिल्ह्यातील अनेक गुन्हे समोर आले. दरम्यान, आता परळीतील मारहाणीचा एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या व्हीडीओमध्ये १२ तरुणांनी एकाला मारहाण केली. मारहाण झालेल्या तरुणाचे नाव हनुमान दिवटे असे आहे. त्याला समाधान मुंडे आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केली असून मारहाण करत असताना या तरुणांनी त्याचा व्हीडीओ बनवला.
या व्हीडीओमध्ये शिवराज जमिनीवर पडल्याचे दिसत आहे. शिवराजच्या बाजूने समाधान मुंडेसह अन्य तरुणांनी कडे केले आणि समाधान मुंडे याने काठी आणि बाबूंने मारहाण केली. यावेळी शिवराज मोठ्या ओरडून मारु नका अशी विनंती करत आहे. या मारहाणीत तो तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
शिवराज हा अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला गेला होता. तो परतत असताना त्याचे पेट्रोल पंपापासून अपहरण केले. त्याला टोकवाडीतल्या रत्नेश्वर मंदिर परिसराजवळ घेऊन गेले. तिथे असलेल्या झाडींमध्ये त्याला कडे करुन मारहाण केली. या प्रकरणाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी समाधान मुंडेसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.