लातूर : प्रतिनिधी
येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, सुनिल कॉम्प्लेक्स येथिल फ्रुट मार्केट आणि अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सोन्या मारूती देवस्थान परिसरात सडक्या फळांच्या व कॅरिबॅग मुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या ठिकाणी फळ बाजारा असल्याने उरउरीत कचरा येथेच टाकला जात असल्याने येथील नागरीकांना घाणीचा सामना करावा लागत आहे.
सुनिल कॉम्प्लेक्स येथिल फ्रुट मार्केट मध्ये हजारो क्विंटल फळांचा रोज लिलाव करण्यात येतो. याठिकाणी लाखो रूपयांची उलाढाल होत असते. मात्र या ठिकाणी फेकुन दिलेल्या फळांमुळे व कॅरिबॅगमुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे येथील व्यापारी, भाविक व नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बाजार समिती सदर ठिकाणी नियमित स्वच्छता करत नसल्याने या ठिकाणी अस्वच्छतेची परिस्थिती उद्धभवली आहे. या परिसरात प्रचंड घाण होत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत असून या परिसरातील नियमित स्वच्छता करणे गरजेचे आहे. याठिकाणी फळे विक्रेत्यांची, कमिशन एजंटची दुकाने असून येथे दिवसभर फळांच्या माध्यमातून लाखो रूपयांची उलाढाल होते. पण अनेक दुकानदार कचरा व सडलेली फळे उघड्यावरच फेकून देण्याचा प्रताप व्यापारीच करतात. येथील नागरीकांसह व्यावसायिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सडलेली फळे उघड्यावर फेकून दिली जात असल्याची वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे लातूर शहर महानगरपालिका वतीने तातडीने या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी अशी मागणी व्यापारी, भाविक यांच्या ेडून करण्यात आली आहे. पुढिल काहि दिवसात हि या परिसरातील स्वच्छता केली नाहि तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रसिद्धी प्रमुख डी.उमाकांत, उपाध्यक्ष बरकत शेख, फारुख तांबोळी, इब्राहिम शेख, अब्दुल शेख,जमील नाना यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.