31 C
Latur
Monday, May 19, 2025
Homeअंतरराष्ट्रीयज्योती मल्होत्रा पाठोपाठ आणखी एका पाकिस्तानी हेराला अटक

ज्योती मल्होत्रा पाठोपाठ आणखी एका पाकिस्तानी हेराला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
ज्योती मल्होत्रा पाठोपाठ उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये रविवारी यूपी एटीएसने एका आयएसआय एजंटला अटक केली आहे. पोलिसांनी शहजाद नावाच्या व्यक्तीला मुरादाबादमधून हेरगिरीच्या प्रकरणात अटक केली. शहजादच्या पत्नीने त्याने हेरगिरी केलीच नाही असे म्हटले आहे. शहजादच्या पत्नीचे म्हणणे आहे की तिचा पती पाकिस्तानातून कापड आणून व्यवसाय करतो. यूपी एटीएस आरोपीची चौकशी करत आहे.

आरोपीच्या चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. सध्या चौकशी सतत सुरू आहे. एटीएसच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की भारत आणि पाकिस्तान सीमेवर शहजाद अनेकदा गेला आहे, ज्यामध्ये आणखी काही महत्त्वाचे खुलासे होणे बाकी आहे. मुरादाबादमध्ये जासूसाच्या अटकेसंदर्भात जेव्हा रामपूर येथे राहणा-या शहजादच्या पत्नी रजियाची चौकशी करण्यात आली, तेव्हा तिने सांगितले की माझा पती शहजाद कापडाचा व्यवसाय करायचा. जर काम उपलब्ध असेल तर ते करायचे, नाहीतर तो फळे-भाज्यांचा ठेलाही लावायचा.

पतीवर खूप अन्याय होत आहे
रजियाने कबूल केले की तिचा पती पाकिस्तानच्या लाहोरमधून सूट आणायचा. शहजादच्या पत्नीने सांगितले की वर्षातून एक-दोन वेळा तो पाकिस्तानला जायचा, तिथून सूट आणायचा. अटकेसंदर्भात माहिती विचारली असता, शहजादच्या पत्नीने सांगितले की आम्हाला काहीच माहिती नाही. तिने म्हटले की लोक माझ्या पतीला दोषी ठरवत आहेत. माझ्या पतीवर खूप अन्याय होत आहे.
आयएसआय एजन्सीसाठी काम केल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर पत्नीने म्हटले की नाही, हे सर्व खोटे आहे. जे काही आरोप लावले जात आहेत, ते खोटे आहेत. महिलेने सांगितले की तिच्या पतीचा कापडाचा व्यवसाय होता. जेव्हा रजियाला विचारले गेले की शहजादसोबत आणखी कोणी पाकिस्तानला जायचे का? तेव्हा तिने उत्तर दिले की तिचा पती शहजाद एकटाच पाकिस्तानला जायचा आणि तिथून कापड आणून भारतात विकायचा. माझ्या पतीचा करक शी कोणताही संबंध नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR