31 C
Latur
Monday, May 19, 2025
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती

मोठी बातमी! विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती

विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागल्याची माहिती समोर आली आहे. ही शॉर्टसर्किटमुळे लागली. ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग स्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. यावेळी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आगीची पाहणी केली.

ह्लस्कॅनिंग मशिनमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग आटोक्यात आणली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही थोड्या वेळात पोहोचतील. आग एवढी मोठी नाही, असंही राहुल नार्वेकर म्हणाले.

विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग लागल्यानंतर नेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आगीची पाहणी केली. यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही आगीची पाहणी केली.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR