28.8 C
Latur
Tuesday, May 20, 2025
Homeमहाराष्ट्रदरोडेखोरांनी नव्हे तर नव-यानेच घेतला बायकोचा जीव

दरोडेखोरांनी नव्हे तर नव-यानेच घेतला बायकोचा जीव

२४ तासांत फुटले बिंग; कोल्हापुरातील घटनेमागे धक्कादायक कारण

कोल्हापूर : प्रतिनिधी
दरोडेखोरांच्या हल्ल्यात पत्नीचा खून झाल्याचा बनाव करणा-या पतीचे बिंग अवघ्या काही तासांत फुटले आहे. मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाल्यामुळे पतीने पत्नीचे दागिने गहाण ठेवून कर्ज फेडण्याचा डाव आखला. मात्र दागिने मागितल्यानंतर पत्नीने नकार दिल्यामुळे रागाच्या भरात पतीने पत्नीचा खून केला. परंतु दरोडा पडल्याचा बनाव रचून सर्वांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र पोलिस तपासात पतीचं सत्य समोर आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील या घटनेने दोन दिवसांपूर्वी सर्वत्र खळबळ उडाली होती.

दरम्यान,आजरा तालुक्यातील मडिलगे गावात रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास चौघा सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याचे वृत्त समोर आले होते. सुशांत गुरव यांच्या पत्नी पूजा गुरव यांचा निर्घृण खून करत तिच्या गळ्यातील दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याचा दावा केला जात होता. या दरोड्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती.

या घटनेची नोंद आजरा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. हल्ल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आणि अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा उलगडा झाला. फिर्यादी पती सुशांत गुरव हाच मुख्य आरोपी असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील आजरा तालुक्यामध्ये मडिलगे गावातील गुरव गल्लीत आरोपी सुशांत गुरव (वय वर्षे ३५) हा आपली पत्नी पूजा गुरव (वय वर्षे ३२) आणि दोन लहान जुळी मुलं सोपान आणि मुक्ता यांच्यासह राहत होता. सुशांत आणि त्याची पत्नी पूजा गुरव हे दोघेही आचारी म्हणून काम करत होते.

रविवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास लघुशंका आल्याने मी उठून बाथरूमला बाहेर गेलो, यावेळी चार अज्ञात दरोडेखोर मागील दरवाजातून अचानक घरात आले. पत्नी पूजा हिच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिला ठार मारलं. तिच्या हातातील दागिने आणि पैशांची बॅग ओढून पळून गेले, यावेळी आपल्याला देखील मारहाण झाली असल्याची फिर्याद सुशांत गुरव याने पोलिसांना दिली होती.
यानुसार पोलिसांनी आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

घटनेचे गांभीर्य ओळखत पोलिसांनीही तपासाची चक्रं वेगाने फिरवली. पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथक, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने तपास सुरू केला. यावेळी फिर्यादी ही घटना खून व दरोडा पडला असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय तपास अधिका-यांना आला. त्यांना फिर्यादीकडून घटनेचे प्रात्यक्षिक करून घेत असताना फिर्याद व प्रात्यक्षिक यामध्ये तफावत आढळून आली.

पतीचा कबुलीजबाब
पतीने अनेक जणांकडून आणि बँकेकडून कर्ज घेतलेले होते. तो मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडण्यासाठी सुशांतने पत्नी पूजा हिच्यासमोर सोन्याचे दागिने गहाण ठेवून, लोकांची देणी आणि बँकेचे कर्ज भागवण्याचा पर्याय दिला होता. तसेच आपल्या सोरायसिस या आजारावर औषधोपचार करूया, असेही सांगितले. मात्र यावरून पती-पत्नीमध्ये जोरदार वादावादीला सुरुवात झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR