23.5 C
Latur
Wednesday, May 21, 2025
Homeराष्ट्रीयपूजा खेडकरला मोठा दिलासा

पूजा खेडकरला मोठा दिलासा

सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
वादग्रस्त ठरलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून आयएएस पद गमावलेल्या पूजा खेडकरवर गुन्हा दाखल झालेला आहे.

उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात तिला सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. २०२२ मधील नागरी सेवा परीक्षेत फसवणूक आणि ओबीसी, दिव्यांग आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेण्यासह इतर आरोप खेडकरवर आहेत.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने खेडकर हिला फसवणूक प्रकरणाच्या चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या बाजू मांडणा-या वकिलांनी खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास जोरदार विरोध दर्शवला. त्या तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच त्यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे सांगत पोलिसांनी तिच्या जामिनाला विरोध केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR