24.5 C
Latur
Thursday, May 22, 2025
Homeमहाराष्ट्रकुणाच्या लग्नाला गेलो ही माझी चूक काय?

कुणाच्या लग्नाला गेलो ही माझी चूक काय?

अजित पवार संतापले

पुणे : वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली. वैष्णवी-शशांकच्या लग्नाला अजित पवारही उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच वधू-वरांना फॉर्च्युनर गाडीच्या चाव्या देण्यात आल्या होत्या. मात्र आता वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यातील वातावरण तापलं असून त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कुणाच्या लग्नाला गेलो ही माझी चूक काय? चूक असेल तर फासावर लटकवा असा संताप व्यक्त करत अजित पवार यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. हुंड्यासाठी छळ झाल्याने वैष्णवीने जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे. तर वैष्णवीची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. विशेष म्हणजे अजितदादांच्या गटाच्या नेत्याची वैष्णवी ही सून होती. तसेच अजितदादाही या लग्नाला हजर होते. या सर्व प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. या प्रकरणात आपली उगाच बदनामी केली जात आहे. कुणाच्या लग्नाला जाणं ही माझी चूक आहे का? उगाच बदनामी करताय. माझी चूक असेल तर फासावर लटकवा, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

तुम्ही घरचे लोक आहात मी सांगतो, तुम्ही अनेक जण मला लग्नाला बोलावता. शक्य असेल तेवढं यायचा मी प्रयत्न करतो, त्या भागात असेन तर उशिरा का होईना मी लग्नाला हजेरी लावतो. आता एखाद्या लग्नाला मी गेलो, आणि त्यांनी नंतर त्यांच्या सुनेला काही वेडेवाकडे केले, त्रास दिला तर तिथे माझा (अजित पवारचा) काय संबंध आहे? असा थेट सवाल अजित दादांनी विचारला. अजित पवारनी त्यांना सांगितलं का असे कर म्हणून?

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR