पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सून वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी करण्यात आली आहे.
दरम्यान, राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सूनबाई मयुरी जगताप-हगवणे यांनी हगवणे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. मयुरी यांनी सांगितले की, २०२२ मध्ये त्यांचे सुशील हगवणे यांच्याशी लग्न झाले होते. त्यांची नणंद, दीर आणि सासू त्यांना सतत त्रास देत होते, पण त्यांचे पती सुशील नेहमी त्यांच्या बाजूने उभे राहायचे. यामुळे कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या पोटच्या मुलालाही मारहाण केली.
मयुरी यांनी पुढे सांगितले की, त्यांच्या नणंदेने आणि दिराने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतला होता, तर सास-यांनी त्यांच्यावर हात उचलला होता. या त्रासामुळे त्यांनी वेगळे राहण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना त्यातही यश आले नाही. मयुरी हगवणे यांनी हगवणे कुटुंबावर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. वैष्णवी हगवणे यांचा मृत्यू हत्या होती की आत्महत्या, याचा तपास सध्या सुरू आहे.
मामा, माझी चूक झाली-
वैष्णवीच्या मामांनी सांगितले की, लग्नाच्या काही महिन्यांतच तिच्यावर अत्याचार सुरू झाला होता. एकेक घटना समोर येत गेली आणि एका क्षणी वैष्णवी म्हणाली, ‘मामा, माझी चूक झाली.’ या एका वाक्याने तिच्या निर्णयाचा पश्चात्ताप स्पष्ट झाला होता. हा पश्चात्ताप तिच्या आत्महत्येचा संकेत होता, हे तेव्हा कुणालाच ठाऊक नव्हतं.
फॉर्च्युनर, सोनं, घड्याळ आणि तरीही न संपणारी हाव :
वैष्णवी आणि शशांक यांचे लग्न प्रेमविवाह होता. घरच्यांचा विरोध असूनही वैष्णवीने हट्टाने लग्न केलं. लग्नात ५१ तोळे सोनं, चांदीची भांडी, आणि फॉर्च्युनर गाडी दिली असूनही हुंड्यासाठी छळ थांबला नाही. फॉर्च्युनरऐवजी टॠ ऌीू३ङ्म१ बुक केल्यावर हगवणे कुटुंबियांनी गोंधळ घातला आणि मोठ्या गाडीची मागणी लावून धरली, असे तिच्या मामांनी सांगितले.
‘माझ्या आजूबाजूच्या भिका-यांकडेही मोठ्या गाड्या असतात, मग मला का नाही?’ असा तर्क देत हगवणे कुटुंबाने फॉर्च्युनर आणि १.२० लाखाचं घड्याळ मागून घेतलं. वैष्णवीचं लग्नाचं स्वप्न हळूहळू छळाच्या काळोख्या वास्तवात बुडत गेलं.