20.2 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeधाराशिवतोरंबा येथे चार लाखाची रोकड व सोन्याचे दागिने लंपास

तोरंबा येथे चार लाखाची रोकड व सोन्याचे दागिने लंपास

धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील तोरंबा येथे ८ डिसेंबर रोजी रात्री चोरीची घटना घडली. चोरट्यांनी एका महिलेचे घर फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ९५ हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाणे येथे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील तोरंबा येथे शुक्रवारी दि. ८ डिसेंबरच्या रात्री चोरट्यांनी जनाबाई चंद्रकांत सुर्यवंशी (वय ५०) यांचे घर फोडले. त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील डब्यात ठेवलेले ४५.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, पर्समधील रोख रक्कम १ लाख ३० हजार रूपये तसेच दुचाकी असा एकूण ३ लाख ९५ हजार रूपये किंमतीचा माल चोरुन नेला. या प्रकरणी जनाबाई सुर्यवंशी यांनी दि. ८ डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पोलीस ठाणे येथे कलम ४५७, ३८० भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR