23.3 C
Latur
Friday, May 23, 2025
Homeमहाराष्ट्रशिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करू नका

शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करू नका

संभाजी भिडे यांची मागणी

कोल्हापूर : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महत्वाची मागणी केली आहे. शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून रोजी साजरा करू नये. त्या दिवशी साजरा करण्यात येणारा शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे. तसेच तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा केला पाहिजे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून १६७४ रोजी राज्याभिषेक पार पडला होता. त्यामुळे ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी येतो. त्याप्रमाणे शिवराज्याभिषक सोहळा साजरा करावा, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली. आपण अजून ब्रिटिशांच्या प्रथेप्रमाणे तारखेनुसार उत्सव साजरा करतो. हे उत्सव तिथीप्रमाणे साजरे करावे. तसेच रायगडावर असलेली वाघ्या कुत्र्यांची समाधी हटवण्यात येऊ नये, या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

संभाजी राजे यांचा विरोध का?
रायगडावर असलेले वाघ्या कुर्त्याचे शिल्प हटवण्याची मागणी छत्रपती संभाजी राजे यांनी केली होती. त्यांच्या या मागणीला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला होता. वाघ्या कुत्र्याचा इतिहासात कुठेच उल्लेख नाही असे संभाजी राजे यांनी म्हटले होते. त्यांच्या या मागणीला संभाजी भिडे यांनी विरोध केला होता. त्यामुळे हा वाद काही दिवसांपूर्वी चांगला रंगला होता.

वाघ्या कुत्राचा वाद काय?
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर वाघ्या या पाळीव कुर्त्याने त्यांच्या समाधीत उडी घेतल्याचे म्हटले जाते. परंतु याबाबत इतिहास तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही. त्याबाबत वेगवेगळे दावे केले जातात. काही जण ही दंतकथा असल्याचे सांगतात. त्यामुळे संभाजी राजे यांनी या वाघ्या कुर्त्याचे शिल्प हटवण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्र लिहून केली होती. धनगर समाजाकडून वाघ्या कुर्त्याचे शिल्प हटवण्यास विरोध केला जात आहे. या वाघ्या कुर्त्याच्या शिल्पासाठी १९०६ मध्ये इंदूरचे राजे तुकोजी होळकर यांनी देणगी दिली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR