मुंबई : प्रतिनिधी
मे महिना संपायला अवघे ७ दिवस उरले आहेत. तरीही अद्याप लाडक्या बहिणींना मे महिन्याचे १५०० रुपये आले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत या महिन्याच्या अखेरपर्यंत पैसे जमा होऊ शकतात. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. परंतु या योजनेत मे महिना संपत आला तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. मात्र, आता येत्या आठवडाभरात पैसे जमा केले जाऊ शकतात. येत्या आठवडाभरात महिलांच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे.
लाडक्या बहिणींना ८ दिवसांत खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजेत. परंतु जर असे झाले नाही तर कदाचित पुढच्या महिन्यात हप्ता जमा होऊ शकतो. पुढच्या महिन्यात जून आणि मे महिन्याचे हप्ते येऊ शकतात. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जर अधिकृत घोषणा झाली तरच महिलांना पुढच्या महिन्यात पैसे येऊ शकतात.
लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी
लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे. अनेक बोगस अर्ज आल्यानंतर पुन्हा पडताळणी करायचे ठरवले आहे. यामध्ये ज्या महिला निकषाबाहेर आहेत किंवा खोटी माहिती देऊन ज्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत. त्यामुळे या महिन्यात काही महिलांचे अर्ज बाद केले जातील.