23.4 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeमहाराष्ट्रकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा ३ दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ३ दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर

नागपूर, नांदेड, मुंबईत विविध कार्यक्रम

मुंबई : प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर येत आहेत. रविवारी रात्री त्याचे नागपूर येथे आगमन होणार आहे. सोमवारी ते नागपूर तथा नांदेड येथील कार्यक्रमांना उपस्थित राहतील. तर मंगळवारी त्यांचे मुंबईत कार्यक्रम आहेत. मंगळवारी त्यांचे मुंबईतील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी रात्री साडेनऊ वाजता नागपूर येथे दाखल होतील. सोमवारी सकाळी जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूट येथील स्वस्ति निवास पंथागारच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ वाजता चिंचोली येथील एनएफएसयूच्या स्थायी परिषदेच्या भूमिपूजनाला ते उपस्थित राहतील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता ते नांदेडला पोहोचणार आहेत. दुपारी नांदेड येथील आनंदनगरातील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे ते अनावरण करतील. दुपारीच ते कुसुम ऑडिटोरियम येथे बैठक घेणार आहेत. संध्याकाळी नांदेडमध्ये त्यांची सभा होणार आहे.

सोमवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन होईल. मंगळवारी सर कावसजी जहांगीर सभागृह येथे स्वातंत्रयवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त अमित शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. माधवबाग संकुलातील प्रसिद्ध लक्ष्मी नारायण मंदिराचे १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल २७ मे रोजी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याने या कार्यक्रमासाठी अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. मंदिराच्या शतकोत्तर परंपरेचा गौरव करणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR