23.4 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते मनीषा पाटील व भक्ती पाटील यांचा सत्कार 

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते मनीषा पाटील व भक्ती पाटील यांचा सत्कार 

लातूर : प्रतिनिधी
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची जिल्हा परिषद शाळा लामजना येथील शिक्षिका मनीषा प्रशांत पाटील यांनी दि.२४ मे रोजी बाभळगाव निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी मनिषा पाटील व भक्ती पाटील यांचा सत्कार केला.
जिल्हा परिषद शाळा लामजना येथे ६४२ इतक्या विक्रमी विज्ञान प्रयोगाचे आयोजन करून वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल जिल्हा परिषद शाळा लामजना येथील शिक्षिका मनीषा पाटील आणि सीबीएससी दहावी परीक्षेत ९५ टक्के गुण मिळविल्याबद्दल तसेच शास्त्रीय गायनात वर्ल्ड रेकॉर्ड केल्याबद्दल भक्ती पाटील यांचे अभिनंदन करुन त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशांत पाटील उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR