23.4 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeलातूरसर्वाधिक बक्षिसे घेत लातूरचे ‘बेबी’ दुसरे 

सर्वाधिक बक्षिसे घेत लातूरचे ‘बेबी’ दुसरे 

लातूर : प्रतिनिधी
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालया अंतर्गत लातूर येथे पार पडलेल्या आंतरपरिमंडलीय नाटयस्पर्धेत छत्रपती संभाजीनगर परिमंडळाच्या नाटय संघाने सादर केलेल्या केस नंबर ९९ या नाटकाने बाजी मारत सर्वोत्तम नाटकाच्या पुरस्कारासह विविध वर्गवारीतील तीन प्रथम व दोन व्दीतीय पुरस्कारही पटकावले आहेत. तर लातूर परिमंडळाने सादर केलेल्या बेबी या नाटकाला वैयक्त­कि प्रथम ४ तर ३ दुस-या क्रमांकाची बक्षीसे घेत नाटयनिर्मितीच्या दुस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कै. दगडोजीराव देशमूख नाटयगृहात दि. २३ व २४ मे रोजी पार पडलेल्या नाटय स्पर्धेत लातूर परिमंडळासह नांदेड व छत्रपती संभाजीनगर परिमंडळाची नाटके सादर झाली. छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंढेकर, लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद बुलबुले, नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम माने, अधीक्षक अभियंता प्रशांत दाणी, प्रेमसिंग राजपूत यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करून सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी श्री औंढेकर यांनी विजेत्या कर्मचा-यांना पुरस्कार देताना म्हणाले की, महावितरणच्या नाटयस्पर्धा या सर्व अधिकारी, कर्मचारी यांना नवी ऊर्जा देणा-या असतात. या स्पर्धेत कर्मचा-यांनी केलेल्या भुमिकांचे कौतूक करत कंपनीच्या ब्रँडींगसाठी कलावंताचा नक्कीच उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली. या स्पर्धेमुळे निश्चीतच प्रत्येक कलावंताच्या मनामधे सहकार्याची भावना निर्माण होईल, असा विश्वासही व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोद देशमूख व सुमती बिडवे यांनी केले तर आभार प्रदर्शन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी महेंद्र चुनारकर यांनी केले.
या स्पर्धेतील इतर बक्षिसे : दिगदर्शक प्रथम-धनंजय पवार (नाटक बेबी) व्दितीय-रमेश शिंदे (नाटक केसनंबर ९९), अभिनय (पुरूष) – प्रथम -प्रशांत जानराव (नाटक बेबी), अभिनय (पुरूष) व्दितीय-प्रमोद देशमूख (नाटक मिना) अभिनय (स्त्री) प्रथम- सपना भोसले (नाटक केसनंबर ९९), अभिनय (स्त्री) व्दितीय- स्वाती लांडगे (नाटक मीना), उत्तेजनार्थ अभिनय प्रथम- कानीफनाथ सुरवसे (नाटक बेबी), व्दितीय-रमेश शिंदे (नाटक केस नंबर ९९), तृतीय- राजकुमार सिंदगीकर (नाटक मीना), नेपथ्य प्रथम- नितीन सुर्यवंशी (नाटक केसनंबर ९९) व्दितीय- कानीफनाथ सुरवसे (नाटक बेबी) तर प्रकाश योजना प्रथम-अभय येरटे (नाटक केसनंबर ९९) व्दितीय- अमित नाचणे (नाटक बेबी) संगीत प्रथम- महादेव गडदे (नाटक बेबी) व्दितीय- सुशेन पाटील (नाटक मीना), रंगभुषा व वेशभूषा प्रथम दिनेश ठाकूर (नाटक बेबी) व्दितीय- पद्मजा देशमूख (नाटक मीना) तसेच नाटयलेखनाचे प्रथम पारितोषिक प्रमोद देशमूख यांनी पटकावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR